कोरोना नियंत्रणासाठी पालिका आयुक्तांचा पुढाकार; कोपरखेैरणे भागात विशेष लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे, परंतू ती पूर्णपणे नियंत्रणात यावी यासाठी आज महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.

नवी मुंबई : शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे, परंतू ती पूर्णपणे नियंत्रणात यावी यासाठी आज महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. सर्वाधिक रुग्ण असलेल्या कोपरखैरणे परिसरात नवी मुंबई पोलिसांतर्फे आज सकाळी लाँगमार्च काढण्यात आला होता. या लाँगमार्चमध्ये मिसाळ यांनी सहभाग नोंदवून घरात रहा, सुरक्षित रहा असा संदेश नागरिकांना दिला.

कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

नवी मुंबई शहरात गेल्या मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे दीड हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील 50 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण सापडण्याची टक्केवारी सुद्धा घसरलेली आहे. मात्र, रोज कोरोनाचे सरासरी 50 रुग्ण सापडतच असल्याने रुग्णांची संख्या हळूहळू का होईना पण वाढत राहिलेली आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही नागरीकांचे घराबाहेर रस्त्यावर पडण्याचे प्रमाण घटलेले नाही. जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली आजही रस्त्यावर भरवल्या जाणाऱ्या बाजारपेठा गजबजलेल्या असतात. कन्टेन्मेंट झोनमध्येही फारशी दक्षता घेतली जात नाही. कन्टेन्मेंट झोनमध्ये नागरिक रस्त्यावर फिरल्यास कोरोना वाहकाच्या साखळ्या निर्माण होऊन अधिक आजार फोफावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आज नवी मुंबई पोलिसांतर्फे कोपरखैरणे परिसरात रस्त्यावर लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यामध्ये परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्यासह अण्णासाहेब मिसाळ सहभागी झाले होते. पोलिसांनी रस्त्यावर संचलन करून बाहेर न फिरण्याचे नागरिकांना आवाहन केले. 

मोठी बातमी ः परप्रांतीय कामगार करताय मुंबईला 'जय महाराष्ट्र'; प्रशासनाकडूनही मिळतेय सहकार्य

महापालिकेचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या जोखमीने आणि तत्परतेने कोरोनाविरोधात लढत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांची सेवा करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मी या लाँगमार्चमध्ये सहभागी झालो. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

कोपरखैरणे भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे लॉंगमार्च करण्यासाठी पोलिसांनी या भागाची निवड केली. संचारबंदीच्या काळात कोणीही अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर उतरू नये, असा संदेश देण्यात आला. कायद्याचे उलंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ - 1

मोठी बातमी ः Coronavirus : फक्त 2 मीटरचं सोशल डिस्टन्सिंग नाही तर वाऱ्याचा वेगही महत्वाचा, अमेरिकन संस्थेचा अहवाल

शहरातील कोरोनाबाधितांवर दृष्टीक्षेप - 1364
बेलापूर - 82 , नेरूळ - 209, तुर्भे - 314, वाशी - 167, कोपरखैरणे - 274, घणसोली - 150, ऐरोली - 115, दिघा - 52

मयत झालेल्या रुग्णांची संख्या - 45
बेलापूर - 5, नेरूळ - 7, तुर्भे - 14, वाशी - 4, कोपरखैरणे - 9, घणसोली - 3, ऐरोली - 1 दिघा - 2

बरे झालेल्या रुग्णांची विभागनिहाय आकडेवारी  - 532
बेलापूर - 39, नेरूळ - 81, तुर्भे - 74, वाशी - 89, कोपरखैरणे - 86, घणसोली - 79, ऐरोली - 55, दिघा - 30

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal commissioner participate in longmarch in kopar khairane