esakal | कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

कोरोना व्हायरसच्या रुग्णांबाबत एक महत्वाचा दावा करण्यात आला आहे.

कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कोरोना व्हायरसच्या रुग्णांबाबत एक महत्वाचा दावा करण्यात आला आहे. ज्या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा ज्यांना ताप नाही ते रूग्ण संसर्ग पसरू शकत नाही किंवा कोरोनाची लक्षणे नाहीत असे रुग्ण कोरोना संसर्ग पसरवू शकत नाहीत असा दावा आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. 

ज्या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा ज्यांना ताप नाही ते रूग्ण संसर्ग पसरू शकत नाही. अशा रुग्णांना सलग 3 दिवस ताप नसल्यास त्यांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देता येईल. तसेच, त्यापूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी करण्याचीही आवश्यकता नाही. मात्र, अशा रूग्णांना डिस्चार्जनंतर 7 दिवस घरीच आयसोलेट व्हावे लागेल. 

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील सर्वात 'मोठी' बातमी, सहकार विभागाने सुरु केली 'ही' प्रक्रिया

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात 69 टक्के करोना रुग्ण बिनालक्षणे असणारे आढळलेले आहेत. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार, सौम्य लक्षणे असलेले किंवा ताप नसलेल्या रुग्णांपासून कोरोना संसर्ग पसरू शकत नाही. 

देशात करोनाचा कहर वाढताना दिसत आहे. गुरुवारी एका दिवसात 5 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात तीन हजारांहून अधिक रूग्ण बरे झाले तर 132 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. भारतात आता या जीवघेण्या व्हायरसचे 1 लाख 12 हजार 359 रुग्ण आहेत. तसेत, 45 हजार 300 लोक या आजारावर मात करून बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत 3 हजार 435 लोकांनी आपला जीव गमावला आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

लॉकडाऊन 4.0: मुंबईत आजपासून काय सुरु होणार?

कोरोना रूग्णाला दाखल करुन 10 दिवसांत जर त्याचा ताप कमी झाला की लक्षणे सौम्य असतील किंवा शेवटच्या तीन दिवसांत ताप नसेल तर चाचणीशिवाय त्या व्यक्तीला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. शिवाय ज्या रुग्णांनी 10 दिवसांचा कालावधी पुर्ण केला आहे ते रुग्ण कोरोना संसर्ग पसरवू शकत नाहीत. कारण, 10 दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्यातील लक्षणांमधील तीव्रता कमी होते. त्यामूळेच त्यांना शेवटच्या तीन दिवसांत ताप नसेल किंवा कोणतेही लक्षणे नसतील तर डिस्चार्ज दिला जातो. हे त्या व्हायरसच्या आणि रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर ही अवलंबून असते. - डॉ. मधुकर गायकवाड, जनरल फिजिशियन

asymptomatic patients do not spread covid 19 says health ministry  

loading image
go to top