

Municipality action on hawkers supporters
ESakal
डोंबिवली : पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र तरीही काही फेरीवाले स्टेशन परिसरात आपले बस्तान कायम मांडून आहेत. त्यांना पालिका कर्मचारी, अधिकारी यांचा वरदहस्त असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. मात्र आता पालिका आयुक्तांनी याविरोधात कडक भूमिका घेतली आहे. या कारवाईत अडथळा आणल्याचा ठपका ठेवत ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकप्रमुख अरुण जगताप यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा रंगली आहे.