

Municipal Corporation Election Vote Counting
ESakal
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून, मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निर्भय आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करून पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत हेतुपुरस्सर किंवा अनावधानानेही चूक होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी सर्व २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.