

Parking Fee
ESakal
मुंबई : सार्वजनिक वाहनतळांवरील पार्किंग शुल्काचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या ३७ सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटरच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मासिक पार्किंग शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुरेशी वाहनतळ व्यवस्था नसलेल्या जुन्या इमारती, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) इमारतींतील वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.