

BMC Action On Hawkers
ESakal
मुंबई : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पश्चिम उपनगरातील वर्दळीच्या ‘के-पश्चिम’ (अंधेरी) विभागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील निष्कासन मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी पालिकेने कंत्राटी कामगारांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी कंत्राटी कामगार पुरवण्यासाठी पालिकेने नोंदणीकृत अशासकीय संस्थांकडून मोहरबंद इच्छापत्रे मागवली आहेत.