

Hospital Privatization Meal System
ESakal
मुंबई : महापालिकेने रुग्णालयांमधील अंतर्गत स्वयंपाकघर व्यवस्था बंद करून खासगी कॅटरर्समार्फत ‘थाळी प्रणाली’ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कस्तुरबा संसर्गजन्य रोग रुग्णालयातील नर्सेस आणि कर्मचाऱ्यांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. नव्या वर्षापासून या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना सकाळचा व सायंकाळचा नाश्ताही मिळेनासा झाल्याने सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत आहे.