

Mumbai BMC Election
ESakal
मिलिंद तांबे
मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या रणांगणात या वेळी केवळ नवे चेहरेच नाही, तर नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव असलेले जुनेजाणते खेळाडूही उतरले आहेत. पाच किंवा त्याहून अधिक वेळा पालिकेची पायरी चढलेल्या या उमेदवारांनी पक्षांतराच्या लाटेतही आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे.