
मुंबई : पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महानगरपालिकेमार्फत नियमित प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. विशेषतः गणेशोत्सव जवळ आल्याने मंडळांच्या परिसरात धूरफवारणीसह डास निर्मूलनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.