
Mumbai Highway Traffic
ESakal
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पहिल्यांदाच स्वतंत्र महामार्ग विभाग (हायवे सेल) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा विभाग महापालिकेच्या रस्ते विभागांतर्गत कार्यरत राहील आणि त्याचे नेतृत्व मुख्य अभियंता (रस्ते) करतील. मात्र वाहतूक कोंडीवर हा उपाय ठरू शकणार नसल्याचे मत वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.