विरार - बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री होत असल्याने त्या विरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रभाग समिती 'जी' वालीव कार्यक्षेत्रात वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विकास पाटील यांच्या नियंत्रणाखाली प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे ३५०० किलो (३.५ टन) प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.