

Banners on school buses on Municipal Election
ESakal
डोंबिवली : महापालिका म्हणजे ‘अलिबाबाची गुहा’ असल्याप्रमाणे काही नगरसेवक वागत असल्याचा थेट आरोप करत, येत्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे डोळे उघडणारी परखड जनजागृती डोंबिवलीतील विद्यानिकेतन शिक्षण संस्थेने केली आहे. संस्थेच्या शाळेच्या बसवर झळकविण्यात आलेल्या फलकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सामान्य नागरिकांमध्येही यावर चर्चा रंगू लागली आहे.