
मुंबई : खार येथून साकीनाका येथील मिठी नदी परिसरातील कचरापेटीबाहेर गेल्या ३० आणि ३१ जुलै च्या रात्री मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकणाऱ्या ‘द गौरव कॅटरर्स’वर कुर्ला ‘एल’ विभागाकडून १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, एका ठिकाणचा कचरा अशाप्रकारे इतरत्र नेऊन टाकणाऱ्या एकूण ७ आस्थापनांकडून १२ जून पासून आजपर्यंत ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.