

Voting Ink
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पॅनल क्रमांक नऊमध्ये गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप करत मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेसच्या उमेदवार माधवी चौधरी यांनी निवडणूक प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.