Mumbai Pollution: अत्‍याधुनिक वाहने धूळ रोखणार, अनुभवी अभियांत्रिकी संस्था, कंपन्यांकडून मागवले अर्ज

Mumbai BMC: प्रदूषण प्रमाण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धूळ रोखण्यासाठी मोबाईल मिस्टिंग व्हॅन भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
Pollution

Pollution

ESakal

Updated on

मुंबई : ​मुंबईतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील अरुंद गल्ल्या आणि मुख्य रस्त्यांवर साचणारी धूळ दाबण्यासाठी आता अत्याधुनिक मोबाईल वॉटर मिस्टिंग आणि स्प्रिंकलर यंत्रणा भाडेतत्त्वावर तैनात करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने ई-निविदा प्रसिद्ध केली असून, २६ विशेष वाहनांचा ताफा शहरात दाखल होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com