

BEST Bus
ESakal
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाने सार्वजनिक वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शहर व उपनगरांत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या तब्बल १,०२३ बस निवडणूक कामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. तर खासगी १,१६० बस आणि एसटीच्या १०१ बस निवडणुकीसाठी सज्ज असणार आहेत. परिणामी १३ ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबईतील प्रवासी बससेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.