

BMC Election 8 candidates won from Koli community
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीत कोळी समाजाने यंदा आपली राजकीय ताकद अधोरेखित केली आहे. विविध पक्षांतून रिंगणात उतरलेल्या कोळी समाजाच्या १३ उमेदवारांपैकी तब्बल आठ उमेदवारांनी विजय मिळवत पालिकेत प्रभावी उपस्थिती निर्माण केली आहे. कोळीवाड्यांचे प्रलंबित प्रश्न, मासळी बाजारांवरील गंडांतर, पुनर्विकासाच्या नावाखाली होणारी पिळवणूक आणि स्वतंत्र धोरणाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल समाजासाठी निर्णायक मानला जात आहे.