

municipal elections Door-to-door campaigning
ESakal
मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी साडेपाचला थंडावल्या. सभा, रॅली आणि मिरवणुकांवर आता बंदी आली असली, तरी उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर ‘डोअर टू डोअर’ (घरोघरी) प्रचाराची मुभा असेल. पैसे किंवा वस्तूंचे वाटप करणे हा गंभीर गुन्हा ठरेल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज स्पष्ट केले आहे.