

Mumbai BMC Election
ESakal
मुंबई : निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येऊ लागला असून राजकीय वातावरण तापत आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर विविध पक्षांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. या उद्घाटनांच्या निमित्ताने पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक गल्लीबोळात फिरून घरोघरी भेटी देत थेट मतदारांशी संवाद साधत आहेत.