

Municipality Action On Tax Defaulters
ESakal
मुंबई : मालमत्ताकर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाई सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने एकूण ३४ मालमत्तांना ई - लिलाव प्रक्रिये अंतर्गत दीर्घ मुदतीची नोटीस जारी केली आहे. त्यात मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल आणि संमिश्र वापराच्या मालमत्तांचा समावेश आहे. या ३४ थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण ५४८ कोटी ६९ लाख ८२ हजार ४८७ रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे.