
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबविताना दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. पीओपी मूर्तींचे शास्त्रोक्त पुनर्प्रक्रिया आणि विसर्जनावेळी जमा झालेले निर्माल्य सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करणे यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन यंदा जमा झालेला पीओपीचा लगदा अज्ञातस्थळी साठवण्याचा निर्णय घेतला आहे.