
मुंबई : शहरातील नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. या कामात पारदर्शकता यावी, यासाठी नालेसफाईच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पालिकेने शनिवारी घेतला. त्यामुळे कंत्राटदाराच्या नालेसफाईवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच राहणार आहे.