Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

Thane News: दहा नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेमुळे मुरबाडमध्ये राजकारण तापले आहे. व्हायरल फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे मुरबाडमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
Murbad Nagar Panchayat

Murbad Nagar Panchayat

ESakal

Updated on

सरळगाव : मुरबाड नगर पंचायत येथे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्याविरोधात २६ फेब्रुवारीला बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगर पंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमधील सात आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी ‘परिवर्तन पॅनल’ची स्थापना करून आमदार किसन कथोरे यांना राजकीय शह दिला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com