Murder: वसई विरार महिलांसाठी सुरक्षित आहे का? केवळ 15 दिवसात इतक्या महिलांची झाली हत्या

Vasai Virar Nalasopara : मन सुन्न आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या घटनांनी चिंतेचे वातावरण
Murder: वसई विरार महिलांसाठी सुरक्षित आहे का? केवळ 15 दिवसात इतक्या महिलांची झाली हत्या
Murdersakal

Mumbai Crime: वसई विरार नालासोपारा परिसरात महिलांच्या हत्या, विनयभंग, प्राणघातक हल्ल्याच्या घटना दिवसागणिक वाढत जात आहेत. या तिन्ही शहरात मागच्या 15 दिवसात वेगवेगळ्या कारणावरून 3 महिलांची निर्घृणपणे हत्या, एका उच्य शिक्षित महिलेचा विनयभंग आणि एकीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

यातील एक हत्या प्रेम प्रकरणातून, दुसरी हत्या कौटुंबिक वादातून, आणि तिसरी हत्या विवाहबाह्य संबंधातून झाली आहे. विरार मधील पती चा प्राणघातक हल्ला कौटुंबिक वादातून झाला आहे. मात्र वसई स्थानक परिसरातील 32 वर्षीय उच्य शिक्षित महिलेचा विनयभंग वासनांध विकृतीतून झाला आहे. या सर्व घटनां अतिशय माणुसकीला।काळिमा फासणाऱ्या असून, मन सुन्न करणाऱ्या आहेत. तर दुसरीकडे कायदा सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह ही निर्माण करत आहेत.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणा-या वसई विरार नालासोपारा शहराला या घटनांनी एक विकृत गुन्हेगारीचा कलंक लागल्या जात असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Murder: वसई विरार महिलांसाठी सुरक्षित आहे का? केवळ 15 दिवसात इतक्या महिलांची झाली हत्या
Nashik Bribe Crime : लाचखोर APIला पुन्हा PSI! आयुक्तांचा दणका; वर्षभरासाठी पदावनत

18 जून रोजी वसईत आरती यादव या तरुणीची तिच्या प्रियकराने भर रस्त्यात सकाळी साडे आठ वाजता लोखंडी पाण्याने 16 डोक्यात वार करून, निर्घृणपणे हत्या केली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. हत्या होताना 50 च्या वर कामावर जाणारे नागरिक पहात होते. पण कोणीही राक्षसी अवतार धारण केलेल्या आरोपी प्रियकराला अडवले नाही. हत्येचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात अनेकांनी कैद केला.

एवढी माणुसकी मेली होती का? हा प्रश्न आरती यादव हत्याकांडाने निर्माण झाला आहे. वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केले, अनेकांचे जवाब घेतले, पण त्या आरती यादव चा निष्पाप गेलेला जीव परत येणार नाही.

आरतीच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. 24 तास उलटत नाहीत तर 19 जून रोजी विरार मध्ये कौटुंबिक वादातून लक्ष्मी खांबे या महिलेची तिच्या जावयानेचे दारूच्या नशेत निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर 25 जून ला पाचव्या दिवशी विवाहित महिलेची विवाहबाह्य संबंधातून तिच्या प्रियकराने ओडणीने गळा आवळून तिच्या राहत्या घरातच हत्या केली.

Murder: वसई विरार महिलांसाठी सुरक्षित आहे का? केवळ 15 दिवसात इतक्या महिलांची झाली हत्या
Crime News : पैशाच्या वादातून साळ्याने केला जावयाचा खून

आठवडा भरातील तीन हत्येनंतर 30 जूनला मध्यरात्री सव्वा एक च्या सुमारास नेहमी प्रमाणे 32 वर्षांची चार्टर्ड अकाउंट महिला कामावरून घरी जात होती. एक भारदस्त शरीर असणाऱ्या वासनांध नाराधमाणे, दारूच्या नशेत वसई स्थानक परिसरात तुंगारेश्वर च्या गल्लीत तिला अडवून, तिचे तोंड दाबून तिला रस्त्यावर पाडले, तिच्या अंगावर पडून तिच्याशी अश्लील चाळे करत जबरदस्तीने विनयभंग करीत होता. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. पण देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे एक कुत्रा तिचा पाठीराखा म्हणून भुंकत आला आणि तो वासनांध चलबिचल झाला. तेवढीच त्या पीडित महिलेने संधीसाधून वासनाधाच्या मगरमिठठीतून आपली सुटका करून, त्याला लाथ मारून पळ काढला. महिलेच्या धाडसी प्रसंगावधाना मुळे तिचा जीव आणि तिच्यावरील अतिप्रसंग वाचला आहे. ती किरकोळ जखमी झाली. या घटनेचा माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी आरोपी ही अटक केला आहे.

ह्या घटना कमी की काय काल 3 जुलै रोजी सकाळी साडे सात च्या सुमारास विरार रेल्वे स्थानकाच्या ब्रिज वर कामावर जाणाऱ्या पत्नीला पती ने अडवून, कौटुंबिक वाधातून तिच्या गळ्यावर, हातावर धारदार चाकूने वर करून, तिचा गळा आवळून तिला जीव मारण्याचा प्रयत्न केला. पण कामावर जाणाऱ्या प्रवाशाना तात्काळ आरोपी पतीला प्रतिकार करून अडवल्याने तिचा जीव वाचला आहे. पत्नी गंभीर जखमी झाली असून विरार च्या संजीवनी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यात पती ला अटक करण्यात आले आहे.

कौटुंबिक वाद, प्रेम प्रकरण, हत्या, मारामारी, मानसिक छळ, या घटनांचा आलेख वाढला आहे. घटना घडल्या नंतर गुन्हा दाखल होतो, आरोपी अटक होतो. राग आणि भावनेच्या ओघात घटना घडून जाते, एकाचा जीव जातो तर दुसरा जेल मध्ये आपल्या जिवंतपणी मृत्यूच्या वेदना सहन करतो. त्यांच्यावर विसंबून असलेले कुटुंब. निष्पाप मुलं, म्हातारे आई वडील हे देशोधडीला लागतात. क्षणाचा राग किती जणांना उधवस्थ करतो हेच या घटना वरून समोर येत आहे.

Murder: वसई विरार महिलांसाठी सुरक्षित आहे का? केवळ 15 दिवसात इतक्या महिलांची झाली हत्या
Virar Murder: विरारमध्ये पुन्हा झाला खुन; जावयाने केली सासूची हत्या

महिलांच्या बाबतीत पोलीस म्हणून सर्वच तक्रारींचे निवारण कारतोत. प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी महिलांच्या तक्रारीत लक्ष घालून त्यांचे समुपदेशन करतात. घरातील कौटुंबिक वाद असेल आणि ते उग्र रूप धारण करू शकतो असे वाटत असेल तर आम्हाला कळवा असे आम्ही सोसायटी धारकांना ही सूचना केल्या आहेत. आमच्या पोलीस गस्त वाढविल्या आहेत. पण सर्वात महत्वाचे आता पुरुष किंवा महिला यांच्यातील सहनशीलता संपली आहे. आपले अधिकार अबाधित ठेवण्यासाठी थोड्याशाही वादाचे रूपांतर आक्रमकतेकडे जाऊन त्यातून विघटित घटना घडत आहेत. प्रत्येकाने आपल्या रागावर नियंत्रण मिळविले तर अशा घटना घडणार नाहीत

जयंत बजबळे

पोलीस उपायुक्त

मीरा भाईंदर वसई विरार परिमंडळ 03

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com