
नाश्त्यात मीठ जास्त झाल्यामुळे पत्नीची हत्या; भाईंदरमधील घटना
भाईंदर : नाश्ता वेळेवर न दिल्याने ठाण्यात सासर्याने सूनेची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच भाईंदर पूर्व येथे नाश्त्यात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरुन संतप्त झालेल्या नवर्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी पतीला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भाईंदर पूर्व भागातील फाटक रोड परिसरात शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. निलेश घाग हा आपल्या पत्नी आणि बारा वर्षीय मुलासह रहात होता. सकाळी नाश्ता करत असताना निलेशला खिचडीत मीठ जास्त लागले. राग आलेल्या निलेशने पत्नी निर्मला हीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून तीची हत्या केली. यावेळी त्याच्या मुलाने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. नवघर पोलीसांनी निलेशला अटक केली.
निलेश याला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. गेल्या एक आठवड्यापासून खाण्यात मीठ जास्त होत होते. याबबत त्याने पत्नीला समजावले देखील होते. मात्र शुक्रवारी पुन्हा नाश्त्यात मीठ जास्त झाल्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याच्या हातून ही घटना घडली अशी कबूली आरोपीने दिल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक मिलिंद देसाई यांनी दिली.
Web Title: Murder Wife Due Excessive Salt Breakfast Husband Strangled Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..