मनोधैर्य उंचावण्यासाठी कोरोनाबाधितांवर आता हे उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

राजावाडी रुग्णालयात प्रयोग; स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य 

मुंबई : कोरोनाची बाधा झालेले रुग्ण मानसिक तणावाखाली असतात. विलगीकरण केंद्रात मनोरंजनाचे साधन नसल्याने नैराश्‍य वाढते. म्हणून कोरोनाबाधितांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय प्रशासन आणि व्हिजन स्मार्ट इंडिया या स्वयंसेवी संस्थेने एकत्र येऊन संगीतोपचार सुरू केले आहेत. वॉर्डच्या बाहेरून गाणी ऐकवून रुग्णांचे मनोरंजन केले जात आहे.

'का' वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा? मुंबई पालिकेनं घेतला शोध... 

कोरोनाच्या रुग्णांना ठेवलेल्या वॉर्डमध्ये बसवलेल्या स्पीकरवरून संगीत, गाणी ऐकवली जात आहेत. या प्रयोगाला रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रुग्णांना एकटेपणा जाणवू नये, त्यांच्यात सकारात्मकतेची भावना निर्माण व्हावी याची काळजी घेतली जात असल्याचे राजावाडी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकारात्मकता वाढवण्यासाठी रुग्णांचे समुपदेशनही केले जाणार आहे. 

लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

संगीतोपचारांसोबत पेंटिंग थेरपीचा वापरही केला जाणार आहे. चित्रकलेच्या माध्यमातूनही नैराश्‍य बाहेर पडते. त्यामुळे या उपचारांचाही अवलंब करण्यात येणार आहे. रुग्णांच्या आवडीचे खेळ बसल्याजागी उपलब्ध करण्याचाही विचार आहे. रुग्णांचे मनोधैर्य वाढेल, ते आनंदात राहतील हा उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Music therapy on corona patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Music therapy on corona patients