esakal | मुंबई : घाटकोपरच्या मंदिरात दिव्यांची आरास | lamp in Temple
sakal

बोलून बातमी शोधा

Lamp in Temple

मुंबई : घाटकोपरच्या मंदिरात दिव्यांची आरास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : राज्य सरकारच्या (mva government) परवानगीनंतर आजपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यातील धार्मिक स्थळे (religious place open) शासनाने दिलेल्या अटीनुसार खुली करण्यात आली. गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे (corona pandemic) राज्यातील शाळा व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रभाग क्रमांक १२८ चे शाखाध्यक्ष प्रवीण बांदिवडेकर यांच्या वतीने घाटकोपर भटवाडी येथील श्रीसिद्धी गणेश मंदिरात एक हजार आठ दिवे (lamp) लावून दिव्यांची आरास करण्यात आली.

हेही वाचा: मुंबई : फ्लॅटच्या प्रलोभनाने फसवणाऱ्यास अटक

कोरोनामुक्त जगासाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना साकारण्यात आली. या वेळी मनविसे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मांढरे, जनहित कक्षाचे विभाग संघटक आशीष गावडे आदी उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे देशातील स्थिती बदलली असून सामान्य नागरिकांच्या व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता.

मंदिरे बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांवरही संक्रांत ओढवली होती. हारविक्रेतेदेखील अडचणीत सापडले होते. मंदिरे सुरू झाल्यामुळे आता स्थिती पूर्वपदावर येईल. तरीही सुरू झालेल्या शाळा आणि मंदिरे सरकारने बंद करू नयेत, तसेच कोरोनामुळे पसरलेला अंधःकार दूर व्हावा, अशी प्रार्थना आम्ही केल्याचे शाखाध्यक्ष प्रवीण बांदिवडेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

loading image
go to top