esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Pension

शासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण; २१ महिने पेन्शन न मिळाल्याने हैराण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी : राज्य शासनाच्या (mva government) सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना (retired employee) पेन्शन (Pension), ग्रॅज्युईटी आणि इतर भत्ते गेल्या २१ महिन्यांपासून
मिळाले नसल्याने त्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानात साखळी उपोषण (Strike) सुरू केले आहे. शासकीय नोकरीवर (Government Job) दाखल होताना अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणून या कर्मचाऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले जातप्रमाणपत्र जोडले होते.

हेही वाचा: पायाभूत सुविधांकडे KDMC चे दुर्लक्ष; नागरिकांचे मानवी साखळी आंदोलन

त्यानंतर त्यांची जातपडताळणीही झाली होती; परंतु कालांतराने या प्रमाणपत्रांबद्दल शंका उपस्थित करून अधिकारीवर्गाने जात प्रमाणपत्र अवैध ठरवीत देणी रोखली. अनुसूचित जमातीचे एकूण १२,५०० अधिकारी, कर्मचारी यांना अधिसंख्या पदावर वर्ग करण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून १९०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना गेल्या २१ महिन्यांपासून पेन्शन मिळाले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईटस आॅफ ह्युमनच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अनघा वैद्य, आफ्रोहचे महासचिव रूपेश पाल, नागपूर जिल्हाध्यक्ष दामोदर खडगी, ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद कोळी, उपाध्यक्ष अर्जुन मेस्त्री, राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे, घनश्याम हेडाऊ, नरेंद्र भिवापूरकर यांनी केली आहे.

loading image
go to top