Railway Train Update : युटीएस अॅपवरून लोकल तिकीट मिळणार | UTS Application | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai train

Railway Train Update : युटीएस अॅपवरून लोकल तिकीट मिळणार

मुंबई : राज्य सरकारच्या निर्देशानुसार (mva government) कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या (two dose vaccination) लसवंतांना दैनंदिन लोकल तिकीट (daily train ticket) मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पास आणि तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीवर गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन (railway government) आणि राज्य सरकारच्यावतीने युटीएस अॅप, इतर मोबाईल तिकीट सुविधा (mobile ticket facility) पुन्हा सुरू करणार आहेत. त्यामुळे लोकलचे तिकीट, पास युटीएस अॅप (UTS Application) वर मिळणे सोयीस्कर होणार आहे.

हेही वाचा: राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार; अमित देशमुख यांची घोषणा

कोरोना काळात लोकल सेवा बंद होती. त्यानंतर काही महिन्यांत फक्त निवडक प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली. परवानगी विना कोणताही प्रवासी जाऊ नये, त्यामुळे परवानगी असलेल्या प्रवाशांना लोकल तिकीट, पास तिकीट खिडकीवरून देण्यास सुरुवात केली. तर, युटीएस अँप बंद करण्यात आले. मात्र, 30 ऑक्टोबर रोजीपासून राज्य सरकारने रेल्वेला लसवंतांना तिकीट देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तिकीट देणे सुरू केले. परिणामी, तिकीट खिडकीवर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

युटीएस अॅपवरून, मोबाईल अॅपवरून कोणत्याही रांगेविना प्रवाशांना तिकीट काढणे सोयीस्कर आहे. यासह मासिक, त्रैमासिक, सहामाही पास काढल्यास 5 टक्के तिकिटांची रक्कम कमी होते. त्यामुळे प्रवाशांकडून अॅपद्वारे तिकीट, पास काढण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळे प्रवासी अॅपवरून तिकीट देणे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, रेल्वे आणि राज्य सरकार यांच्याद्वारे युटीएस अॅप, इतर मोबाईल अँप यांना अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.

युनिव्हर्सल पास जनरेट करणाऱ्या यंत्रणेला रेल्वेच्या युटीएस अॅप आणि इतर अॅपला जोडण्यात येऊन एकत्रित केले जाणार आहे. प्रवासी युटीएस अँपवरून तिकीट काढताना युनिव्हर्सल पासची क्रॉस व्हेरिफिकेशन होईल. तसेच इतर तांत्रिक कामे केली जात आहे. हे काम पहिल्या टप्प्यात असून रेल्वेच्या क्रिस विभागाद्वारे ही कामे केली जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

loading image
go to top