esakal | डॉक्टरसाहेब... माझ्या मुलाला शिंक आली, कोरोना तर नसेल ना?
sakal

बोलून बातमी शोधा

sneezing-

मुले शिंकली, थोडा ताप आला किंवा खोकला आला तर त्यांना कोरोना झाला नसेल ना, अशा शंका-कुशंकांनी सध्या अनेक पालक चिंताग्रस्त होत आहेत.

डॉक्टरसाहेब... माझ्या मुलाला शिंक आली, कोरोना तर नसेल ना?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाशी (बातमीदार) : मुले शिंकली, थोडा ताप आला किंवा खोकला आला तर त्यांना कोरोना झाला नसेल ना, अशा शंका-कुशंकांनी सध्या अनेक पालक चिंताग्रस्त होत आहेत. कोरोनाची लक्षणे ही अतिशय तीव्र असतात आणि ती समजून घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे कोरोना हा मुलांसाठी जीवघेणा नसतो, हे लक्षात घेऊन पालकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

मोठी बातमी ः पावसाळ्यात दहिसरला पूराचा धोका; मेट्रोने अद्याप पूर्ण नाही केले काम

कोरोनाचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे उद्भवणारे मृत्यू यामुळे भीतीचे वातावरण आहे. अनेक पालकही या संसर्गाला घाबरलेले आहेत. त्यामुळे मुले शिंकली, खोकलली किंवा त्याला थोडा जरी ताप आला तरी त्यांच्या मनात कोरोनाविषयी शंकेची पाल चुकचुकत असते. परिणामी, बालरोगतज्ज्ञांकडे धाव घेणारे किंवा फोनवरून डॉक्टरांवर प्रश्नांचा भडिमार करणारे पालक वाढले आहेत. सध्याच्या कठीण काळामध्ये मुले सर्जनशील उपक्रमांमध्ये कसे रमतील, यासाठी पालकांनी जरूर प्रयत्न केला पाहिजे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश वास्के सांगतात.

मोठी बातमी ः पीएम केअर्स निधीबाबत भूमिका स्पष्ट करा;  उच्च न्यायालयाचे आदेश

मुलांमधील लक्षणे
मुळात कोरोनाची लक्षणे ही बहुतेक वेळा तीव्र स्वरूपाचीच असतात. यामध्ये 100 अंशांपेक्षा जास्त ताप दिवसभर असणे, कोरडा खोकला, अंगदुखी-डोकेदुखीमुळे मुले कीरकीर करणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि श्वास घेताना आवाज होणे, तसेच संबंधित मुले कमी जेवणे, अशी लक्षणे आढळतात. अपवादात्मक स्थितीत मुलांमध्ये जुलाब, उलट्या अशीही लक्षणे दिसून येतात.

मोठी बातमी ः पालघरसह डहाणूत 'निसर्ग' वादळाचे संकट; प्रशासनासह 'एनडीआरएफ' सतर्क

मुलांचा मास्क घट्ट नसावा
मुलांचा मास्क हा घट्ट किंवा खूप जाड असू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा वेगळे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. दोन वर्षांखालील मुलांमध्ये मास्क वापरला नाही तरी चालेल. महत्त्वाचे म्हणजे मास्क कसा सुरक्षितपणे वापरला गेला पाहिजे, हेही मुलांना वेळोवेळी सांगणे गरजेचे आहे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश वास्के म्हणाले.

कोरोनाबाधित मुलांमधील केवळ दोन टक्के रुग्ण गंभीर असतात आणि मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असते. सुमारे ९८ टक्के मुले ही लक्षणेविरहित विषाणूचे वाहक आहेत. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींसोबत किमान तीन फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवून मुलांनी संवाद साधला पाहिजे.
- डॉ. शाम यादव, बालरोगतज्ज्ञ
 

मोठी बातमी ः 1882 च्या विनाशकारी 'द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन' बद्दलची Inside Story !

मुलांसाठी घ्यावयाची काळजी

  •  दोन-तीन तासांनी स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे. त्यातही मुलांना हात धुताना एखादे गाणे-कविता म्हणायला लावावी, जेणेकरून हात धुण्याची क्रिया २० सेकंदांपर्यंत होऊ शकेल आणि विषाणूची साखळी तुटण्यास मोठा हातभार लावता येईल. 
  •  विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन पदरी कापडी मास्क मुलांनी वापराव. हा मास्क उकळत्या पाण्यात टाकून ठेवावा आणि त्यानंतरच स्वच्छ धुवून वापरावा. 
  •  मुलांनी शक्यतो घराच्या आवारातच खेळावे.
  •  मुलांचा आहार सकस, पौष्टिक, समतोल कसा राहील, याकडे लक्ष द्यावे. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने 'व्हिटॅमिन डी' व 'सी'; तसेच 'झिंक' जरूर द्यावे, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील.
loading image
go to top