

Maharashtra Polls: BJP State Chief Sets 122-Seat Goal
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिकेवर भाजपचा महापौर बसावा, ही येथील नागरिकांची अनेक वर्षांची इच्छा असून ती पूर्ण करण्याची ताकद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र त्यासाठी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 122 नगरसेवक निवडून देण्याची जबाबदारी मतदारांनी घ्यावी, असे स्पष्ट आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. डोंबिवलीतील भाजप मेळाव्यात ते बोलत होते.