

Maharashtra Airport Information
ESakal
तुर्भे : विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून भूमिपुत्र आग्रही आहेत. त्यासंदर्भात केंद्र सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे एकूण १६ विमानतळ आहेत. त्यातील नागपूर आणि मुंबई या दोनच विमानतळांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे नाव असून उर्वरित सर्व विमानतळ त्या-त्या शहरांच्या नावाने ओळखली जातात.