नागराज मंजुळे आणि रॉय कपूर फिल्म्स एकत्र बनवणार 'मटका किंग' | Manoranjan News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

siddarth roy kapoor and nagraj manjule
नागराज मंजुळे आणि रॉय कपूर फिल्म्स एकत्र बनवणार 'मटका किंग'

नागराज मंजुळे आणि रॉय कपूर फिल्म्स एकत्र बनवणार 'मटका किंग'

पुणे : रॉय कपूर फिल्म्स निर्मित 'मटका किंग'(Matka King) सीरीजचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंजुळे करणार आहेत.सिद्धार्थ रॉय कपूरचे प्रॉडक्शन हाऊस रॉय कपूर फिल्म्स आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते नागराज मंजुळे(producer nagraj manjule) यांनी 'मटका किंग' नावाची सीरीज(mtka king series) करणार आहेत. भारतात खेळला जाणारा सट्टा, जो मटका म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच विषयावर आधारित सर्वात मनोरंजक कथा तयार करण्याच्या तयारीसाठी प्रॉडक्शन हाऊसची सीरीज तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. आगामी मालिका 1960 आणि 90 च्या दशकातील सत्य घटना आणि रतन खत्री यांच्या जीवनावर आधारित आहे. तो भारतातील जुगार खेळाचा मास्टर म्हणून ओळखला जात असे आणि त्याला 'मटका किंग' म्हटले जायचे. (Nagraj Manjule and Roy Kapoor Films to co-produce 'Matka King')

हेही वाचा: सहा दशकांपासून त्यांची चिखलातूनच वाट

निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर(siddarth roy kapoor) म्हणतात, "नागराज मंजुळेचा 'सैराट'(sairat marathi movie) हा गेल्या दशकातील माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे आणि मला आशा आहे की भारत आणि जगभरात पोहोचेल अशी ही आकर्षक कथा सांगण्यासाठी त्यांच्यासोबत सहयोग करताना मला आनंद होत आहे."

या प्रकल्पाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, “मी एक अतिशय अनोखी आणि हृदयस्पर्शी कथा सांगण्याच्या या नवीन (OTT) संधीची वाट पाहत आहे आणि सिद्धार्थ रॉय कपूरसोबत भागीदारी करत आहोत, आम्ही दोघेही एकच सर्जनशील विचार आहोत. मला आशा आहे की प्रेक्षकांना मटका किंगच्या जगाचा आनंद मिळेल तितकाच जो आपण बनवण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेत आहोत."

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top