

Cracked Nayaigaon–Papdy Bridge Faces Threat from Heavy Dumper Traffic
sakal
विरार : नायगाव स्टेशन परिसरात सुरू असलेल्या नवीन रेल्वे पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती भराव सुरू आहे. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जड डंपरांची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक नायगाव कोळीवाड्यातील घरांना भूकंपासारखे तीव्र कंप देत आहे.सर्वात गंभीर बाब म्हणजे नायगाव ते वसई कोळीवाडा जोडणारा एकमेव नायगाव खाडी पुल. या पुलाला स्पष्ट तडे गेलेले आहेत आणि पुलाची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत जड डंपरांची सततची ये-जा सुरू असल्याने पूल पडण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.