esakal | कळंबोली भागातून २ बाल कामगारांची सुटका | child labour
sakal

बोलून बातमी शोधा

Child Labour

कळंबोली भागातून २ बाल कामगारांची सुटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : नवी मुंबई पोलिसांच्या (Navi mumbai police) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कळंबोलीतील एका मिठाईच्या दुकानावर छापा मारून दोन बाल कामगारांची (child labour) सुटका केली. त्‍यांना कमी वेतनात (less salary) अति श्रमाचे काम देऊन राबविणाऱ्या दुकानाच्या दोन मालकांवर (shopkeeper) गुन्हा दाखल (FIR) करून ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: गरबा बंदीमुळे कलाकारांवर संक्रांत; कोरोनामुळे हतबल, दिवाळी कशी करणार?

कळंबोलीतील दुकानात बालकामगार असल्‍याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनावणे यांना मिळाली होती. त्यानुसार त्‍यांनी सदर दुकानावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महिला सहायक निरीक्षक शेळके व त्यांच्या पथकाने गुरुवारी रोडपाली सेक्टर-२० मधील श्रीजी स्वीट्स ॲण्ड स्नॅक्स दुकानावर छापा मारला.

दुकानात दोन पंधरा वर्षीय मुले काम करताना आढळले. गेल्‍या दोन महिन्यांपासून दुकानमालक कमी वेतनात त्‍यांच्याकडून काम करून घेत होता. याप्रकरणी हसमुख भीमाजी पटेल (२३) व लोकेश लिंगे गौडा (४०) यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्‍यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले.

loading image
go to top