नालासोपाऱ्यात मनसैनिकांना बेदम मारहाण; तिघांना अटक

आठ परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल
Police Arrest
Police Arrestsakal media

नालासोपारा : नालासोपाऱ्यात (Nalasopara) बॅनर लावण्याच्या वादातून मनसैनिकांना (MNS Leaders) बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ (viral video) सोशल मीडियावर व्हायरल (social media) झाला आहे. घटनेत तीन मनसैनिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नालासोपाऱ्याच्या लाईफ केअर रुग्णालयात (Life Care Hospital) उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्व रेल्वे रुळाजवळील लाईफ स्टाईल कॅपिटल मॉलजवळ मुख्य रस्त्यावर बुधवारी (ता. २०) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घटना घडली.

Police Arrest
मुंबईत दहा वर्षात 48 हजार आगी

मारहाण करणारे सर्व जण परप्रांतीय तरुण असल्याने मनसैनिकांत तीव्र संताप असून, परप्रांतीय विरुद्ध मनसैनिक असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात आचोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कमलेश पवार (वय ३०), किरण कुमठेकर (२९), सुभाष जाधव (४०) असे मारहाणीत जखमी झालेल्या मनसैनिकांची नावे आहेत, तर सौरभ पांडे (वय २२), अनिल सिंग (४५) या मारहाण करणाऱ्या परप्रांतीय संशयितांना अटक केली आहे. हातात लाठीकाठी घेऊन त्यांनी मनसैनिकांना बेदम मारहाण केली असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मारहाण सुरू झाल्याची घटना समजताच तत्काळ पोलिस घटनास्थळावर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन जणांना अटक केली. तसेच आचोले पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. इतर फरारी आरोपींचा शोध घेऊन अटक करू, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सांगितले.

"नालासोपाऱ्यात लाईफ स्टाईल कॅपिटल मॉल नव्याने सुरू होत आहे. या मॉलमध्ये मराठी तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे. यासाठी मनसैनिक बॅनर लावण्यासाठी गेले होते; पण तेथील परप्रांतीयांनी कार्यकर्त्यांना अडवून बेदम मारहाण केली. याची आम्ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही याचे जशास तसे उत्तर देणार आहोत."
- प्रशांत खांबे, मनसे पदाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com