
-बाळासाहेब पाटील
मुंबई : विधानसभा निवडणुकीत ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेच्या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करण्याची केलेली घोषणा महायुती सरकारने बासनात गुंडाळली आहे. पीकविमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन योजनांमधून कोणतीही भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे.