esakal | सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं; भाजपचा काँग्रेसला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Nana-Patole-Cycle

सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं; भाजपचा काँग्रेसला टोला

sakal_logo
By
विराज भागवत

भाजपचे केशव उपाध्ये यांनी नाना पटोलेंसाठी केलं खोचक ट्वीट

मुंबई: काँग्रेसने (Congress) शनिवारी मुंबईत इंधन दरवाढीविरोधात मोर्चा (Mumbai Morcha) काढला. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Prices Hike) वाढत्या किंमतींविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Congress Workers) या मोर्चासाठी खास बैलगाडी (bullock cart) आणली होती. बैलगाडीवर उभे राहून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सत्ताधारी भाजपविरोधात घोषणाबाजी करत होते. पण अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या वजनामुळे बैलगाडी तुटली आणि मुंबई अध्यक्ष भाई जगतापांसह सारेच जण खाली पडले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आंदोलनाचे गांभीर्य काहीसे कमी झाले. आता आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी सायकलने जाणार आहे. त्यावरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला. (Nana Patole Trolled by BJP Keshav Upadhye regarding Cycle Rally to Raj Bhavan after Bullock Cart break down Incidence)

हेही वाचा: "यापेक्षा जिमखान्याच्या अध्यक्षाला..."; 'BEST CM'ना टोला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले काही दिवस आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत आहेत. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यापासून ते मरणासन्न अवस्थेत असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी मलबार हिल हँगींग गार्डन येथून ११ वा. सायकलने राजभवनावर जाणार. काही दिवसांपूर्वी अशाच एका आंदोलनामध्ये बैलगाडीचा वापर झाला आणि ती बैलगाडी तुटल्याने आंदोलनाचं हसं झालं. आता मलबार हिल रस्त्यावर तीव्र उतार आहे. त्यामुळे बैलगाडीवरून कोसळलेली काँग्रेस जशी घरंगळत जात आहे तसेच मलबार हिलच्या उतारावरून सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं, असा टोला नाना पटोले आणि काँग्रेसला केशव उपाध्ये यांनी ट्वीटच्या माध्यमातून लगावला.

हेही वाचा: ठाकरे सरकारने थकवले 90 कोटी; 18 जण मागणार 'इच्छामरण'

दरम्यान, काँग्रेसच्या या बैलगाडी मोडण्याच्या घटनेनंतरही भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली होती. "गाढवांचा भार उचलायला बैलांचा नकार! भाई जगताप, तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाने झेपेल तेवढंचं करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना त्या मुक्या जीवांचा विचार करावा!'", अशा शब्दात आमदार प्रसाद लाड यांनी खिल्ली उडवली होती. तर, 'तोल सांभाळा ⁦भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे, याचा आधीच विचार करा", असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला होता.

loading image