मुंबई NCB ची नांंदेडमध्ये धडक कारवाई; कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, तिघांना अटक | Mumbai NCB Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

मुंबई NCB ची नांंदेडमध्ये धडक कारवाई; ड्रग्ज प्रकरणात तिघांना अटक

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई एनसीबीच्या पथकानं (Mumbai NCB) नांदेडमधल्या कामठी इथं धाड टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करत (Drug seized) अंमली पदार्थ बनवण्याचं छुपं उत्पादन युनिट उद्ध्वस्त केलंय. यात 111 किलो पॉपी स्ट्रॉ (खसखसचा पेंढा), जवळपास दिड किलो अफु आणि दिड लाख रुपये जप्त केलेत, तसंच पॉपी स्ट्रॉ तयार करण्याचे दोन मशीन, डिजिटल वजनकाटा, आणि पैसे मोजण्याचं मशीनही जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आलीय. हरदयाल सिंह गुलाब सिंग कटोडीया, जीवन सिंह अवतार सिंह चोपरा आणि जितेंदर सिंह प्रगन सिंह बुल्लर अशी आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा: जामीन मिळण्यासाठी आनंद तेलतुंबडेंचा विशेष NIA न्यायालयात अर्ज

या अमलीपदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारतली किंमत कोट्यावधींच्या घरात असल्याची माहिती एनसीबीचे झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली. पॉपी स्ट्रॉ म्हणजेच खसखसच्या भुशापासून अफु आणि हेरॉइन हा नशेचा पदार्थ बनवला जातो, ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असते.

ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाचा आधार घेऊन हे अमलीपदार्थ बनवण्याचं काम सुरु असल्याचं तपासात समोर आल्याचंही समीर वानखेडे यांनी सांगितलं. याआधीही काही दिवसांपूर्वी नांदेडला मुंबई एनसीबीनं अशीच धाड टाकत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. त्यावेळी जवळपास 1200 किलो गांजा घेऊन जाणारा ट्रक एनसीबीनं पकडला होता.

loading image
go to top