esakal | समीर वानखेडे यांच्या तक्रारीची चौकशी होणार | Sameer Wankhede
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede

समीर वानखेडे यांच्या तक्रारीची चौकशी होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी: केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर मुंबई पोलिसांकडून (mumbai police) पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. यावर चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार असून काही दिवसांत चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर करणार आहे.

हेही वाचा: वरळी डेपोचे विद्युतीकरण पूर्ण; बेस्‍टच्या हरित गतीशीलता प्रवासाला चालना

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांनी भाजपशी संबंधित असलेल्या लोकांची मदत घेतल्याचा आणि काही लोकांना सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते.

या प्रकरणानंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. ओशिवरा कब्रस्तानमध्ये आईच्या कबरीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो असताना ओशिवरा पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी मला फॉलो करत होते, अशी तक्रार वानखेडे यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. या संबंधीचे व्हिडीओ वानखेडे यांनी महासंचालकांकडे दिल्याची माहिती आहे.

loading image
go to top