PM Narendra Modi : एकेकाळी खासदार रेल्वेच्या थांब्यासाठी बोलायचे, आता...; मोदींचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
PM Narendra Modi Mumbai Visit
PM Narendra Modi Mumbai Visit
Updated on

Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी वंदे भारत रेल्वेसंदर्भात यात्रेची माहिती दिली. शिवाय देशभरात सुरू असलेल्या रेल्वेच्या कामाची माहिती दिली.

तसेच राज्यातील डबल इंजिन सरकारच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

PM Narendra Modi Mumbai Visit
Vande Bharat Express : स्वदेशी वंदे भारत ट्रेनची ही १० वैशिष्ट्ये माहितीयेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एकेकाळी खासदार पत्र पाठवून म्हणायचे की आमच्या येथील स्टेशनवर रेल्वे थांबविण्यासाठी काही व्यवस्था करा.

मात्र आता खासदार दबाव टाकतात की, आमच्याकडे देखील वंदे भारत रेल्वे सुरू करा. या ट्रेनमुळे मुंबईतील लोकांचं सुकर होणार आहे. मुंबईतील इस्ट-वेस्ट कनेक्टीव्हीटीसाठी महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे, असंही मोदी म्हणाले.

मोदी पुढं म्हणाले की, मुंबईकरांचं अभिनंदन. २१व्या शतकातील भारतासा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी लागले.

जेवढ्या वेगाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होईल, तेव्हडाच आपला फायदा होईल. लोकांचं राहणीमान सुधारेल. देशात आधुनिक रेल्वे चालवल्या जात आहेत. मेट्रोचा विस्तार होतोय.

PM Narendra Modi Mumbai Visit
Vande Bharat Express : मुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोदींना अनोखी भेट, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बजेटमध्ये १० लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रकचरच्या विकासासाठी ठेवले आहे. त्यात रेल्वेसाठी अडीच लाख कोटींचा वाटा आहे. महाराष्ट्रासाठी यामध्ये तरतूद आहे.

महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारमुळे दळणवळण वेगाने वाढेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com