"बाळासाहेबांचे पोस्टर्स लाऊन मोदींनी निवडणुका जिंकल्यात", शाहांना राऊतांचं खणखणीत उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच महाराष्ट्र घडलेल्या महानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर घणाघाती टीका केली. या टीकेला शिवसेनेचे संजय राऊत यांनी खणखणीत उत्तर दिलंय.   

महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच महाराष्ट्र घडलेल्या महानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर घणाघाती टीका केली. या टीकेला शिवसेनेचे संजय राऊत यांनी खणखणीत उत्तर दिलंय.   

शिवसेना उमेदवारांनी लावले मोदींचे पोस्टर्स 

महाराष्ट्रात शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत  हातमिळवणी करत जनतेचा अपमान केला असल्याचा आरोप अमित शाह यानी केलाय. ट्विटरवर आपलं मत मांडताना, "शिवसेनेचे सर्व उमेदवार हे आमच्या सोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, त्यांचा एकही असा  उमेदवार नव्हता ज्यांनी नरेंद्र मोदींचे पोस्टर्स लावले नाहीत. आमच्या उमेदवारांपेक्षा शिवसेनेच्या उमेदवारांनी त्यांच्या मतदार संघात नरेंद्र मोदींचे मोठ-मोठे पोस्टर्स लावलेत", असं अमित शाह यानी ट्विट केलंय.  

नरेंद्र मोदींनी लावले होते बाळासाहेबांचे पोस्टर्स  

दरम्यान अमित शाहांच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर  दिलंय. जेव्हा बाळासाहेब होते, त्यावेळी तुम्ही त्यांचे पोस्टर लावून मतं मागितलं त्याचं काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. बाळासाहेबांचे पोस्टर्स लाऊन मोदींनी निवडणुका जिंकल्यात असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

शिवसेनेनं मोदींच्या फोटोखाली मतं मागितली आणि मोदींवर विश्वास ठेऊन जनतेनं शिवसेना आमदारांना निवडून दिलं असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाहा यांनी केला होता. त्याचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.
भाजपलाही शिवसेनेच्या राज्यात  फायदा झाला.

अनेक ठिकाणी केवळ शिवसैनिकांमुळं भाजप उमेदवार निवडून आले असा दावाही संजय राऊत यांनी केला.

Webtitle : narendra modi won elections using balasaheb thackerays name sanjay rauts reply to amit shah


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi won elections using balasaheb thackerays name sanjay rauts reply to amit shah