Mumbai High court
Esakal
मुंबई : नाशिकस्थित विपिन बाफनाचे अपहरण आणि हत्याप्रकरणी दोघांना सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने नुकतीच ३० वर्षांच्या कारावासात रूपांतरित केली. हे दोन्ही आरोपी सर्वसामान्य तरुण आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या प्रबळ इच्छेने ते हताश झाले आणि त्यातच त्यांनी हत्या केली, असे निरीक्षण न्यायालयाने त्यांची फाशी रद्द करताना नोंदवले.