

National Highway Road Potholes
ESakal
कर्जत : शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग ५४८-अ वरील उल्हास नदीवरील नव्या श्रीराम पुलाचे उद्घाटन होऊन अवघा महिना उलटत नाही तोच पुलावर आणि जोडरस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.