

Morbe Circle to Kalamboli Link Road
ESakal
पनवेल : पनवेल, नवी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या मोरबे सर्कल ते कळंबोली दरम्यानच्या १४ किमीच्या नव्या जोड रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मोरबे सर्कल थेट कळंबोलीमार्गे जेएनपीए बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूशी जोडला जाणार आहे. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसराच्या आर्थिक व औद्योगिक विकास झपाट्याने होणार असून, पनवेल-मुंब्रा मार्गावरील कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.