esakal | Maharashtra Flood : विद्यार्थ्यांना दिलासा, 'या' परीक्षेसाठी एक संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

Maharashtra Flood : विद्यार्थ्यांना दिलासा, 'या' परीक्षेसाठी एक संधी

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील (Maharashtra) कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली आणि सातारा या भागात झालेल्या पुरामुळे (Maharashtra Flood) 22 ते 27 जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या जेईई मेन्सच्या (JEE Mains Third session) तिसऱ्या सत्रासाठी अनेक विद्यार्थ्यांना बसता आले नाही. त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची (JEE Exam) एक संधी देण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केली आहे. यामुळे राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (National Testing Agency gives one more chance JEE Mains Third session Exam For Flood Area student-nss91)

हेही वाचा: 'TYBSC कम्प्युटर सायन्स' सत्र-६ चा निकाल जाहीर, जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी याबाबत टि्वट करून ही माहिती दिली. यामुळे ही परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इंजिनीअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेला बसू न शकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला असल्याने जे विद्यार्थी या सत्रात परीक्षा देऊ शकणार नाही त्यांना संधी दिली जाणार असलयाचे स्पष्ट केले आहे. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षेचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

loading image
go to top