esakal | साकीनाका बलात्कार प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर सडकून टीका
sakal

बोलून बातमी शोधा

NCW

राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर सडकून टीका

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवरून सोडणारी घटना साकीनाका (sakinaka case) परिसरात शुक्रवारी घडली होती. ३४ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर शनिवारी तिचा मृत्यू झाला. इतकेच नाहीतर पुणे आणि उल्हासनगरमध्ये देखील बलात्काराच्या घटना घडल्या. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं (national women commission) पथक मुंबई दाखल झालं होतं. यावेळी महिला आयोगाच्या सदस्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

हेही वाचा: साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिस प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, असे मत पोलिसांनी व्यक्त केले होते. त्यांच्यावरही महिला आयोगाच्या सदस्यांनी ताशेरे ओढले. पोलिसांचे वक्तव्य अंत्यत दुर्दैवी आहे. पोलिस त्यांच्या जबाबदारीपासून दूर पळू शकत नाही, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सद्स्य चंद्रमुख देवी यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारवरही ओढले ताशेरे -

आरोपींना कोणाची भीती नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ इथे आरोपी निरंकुश आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांची माहिती घेतली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यशासनाचा बेजबाबदारपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत, असा आरोप महिला आयोगाच्या सदस्यांनी केला.

संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. मला हे कळत नाही की सरकार इतकं असंवेदनशील कसं आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असतं तर महिलांना न्याय मिळाला असता, असेही त्या म्हणाल्या.

loading image
go to top