
धारावी : गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले आहे. त्याचा परभणीतील दडपशाही, सोमनाथ सुर्यवंशी कस्टडी मृत्यू याचा सर्व संविधानप्रेमी, समतावादी, पुरोगामी संघटना कडून देशभरात निषेध होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करुन गृहमंत्री अमित शाह हे संविधान मुल्यांच्या विचारांच्या विरोधातील अवैज्ञानिक, मनुवादी विचारांचाच पुरस्कार छुप्या पद्धतीने करीत आहेत.