Crime
sakal
नवी मुंबई : बिहार येथे राहणाऱ्या एका तरुणाने मुंबईतील २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून त्याद्वारे ब्लॅकमेल केल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या तरुणीने धावत्या लोकलमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी कथित प्रियकर अमितकुमार बुधन राम (वय २४) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.