

Navi Mumbai Crime
ESakal
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये हमालीचे काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय व्यक्तीने एका ५५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता. ११) उघडकीस आली. खारघर परिसरात राहणाऱ्या या महिलेला कटरचा धाक दाखवून अनेकवेळा तिच्याकडून गेल्या १० वर्षांत तब्बल २० लाख रुपये उकळल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले.